Parliament Session 2025: ‘तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?’, जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
Parliament Session : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही.’

Parliament Session: जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही
Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरशन सिंदूरवरुन बराच गदारोळ सुरू आहे. काल लोकसभेत यावर दीर्घ चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आपले म्हणने मांडले. त्यानंतर आता आज राज्यसभेत या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चर्चेची सुरुवात करताना, विरोधकांवर जोरदार टीका केली.
Parliament Session: मोदी सरकारच्या काळात काय बदल झाले?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की,
“भारत अनेक वर्षांपासून सीमापार दहशतवादाचा सामना करत होता. आम्ही जे म्हणतो, तेच करुन दाखवतो. पूर्वी अशा मोठ्या घटना घडायच्या, तेवाहा त्यावर फारशी कारवाई केली जात नव्हती. मात्र, गेल्या दशकभरात आम्ही दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले, ज्यामुळे या कारवाया मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. आज दहशतवाद्यांना मिळणारा निधीही थांबला आहे.”
मैत्री नव्हती, मग सिंधू करार का केला?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा पाऊल असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की,
“जेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, तेव्हा असा सिंधू पाणी कराराची काय गरज होती? असे म्हटले गेले की, ही शांतीची किंमत आहे. मात्र, ही तुष्टीकरणाची किंमत होती. त्यांना पंजाब, राजस्थान, हरियाणातील शेतकऱ्यांची काळजी नव्हती. त्यांना पाकिस्तानच्या पंजाबमधील शेतकऱ्यांची काळजी होती.”
मुंबईवर मौन राहिलेले लोक आज आम्हाला सांगतात
आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नाही, पाकिस्तान आहे. मात्र, असे असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी आपली बाजू घेतली. रशियासह अनेक देशांनी जाहीररित्या भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला, यावरुन आमची राजनैतिक कूटनीति किती यशस्वी झाली, हे स्पष्ट होते.
आम्ही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केला. सिंधू जल करार स्थगित कला. भारताने कसा प्रतिसाद दिला, संपूर्ण जगाने पाहिले. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा चेहरा उघड केला. मुंबईच्या घटनेवर मौन राहिलेले लोक आज आम्हाला काय करावे, हे शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
कान उघडून ऐका, ट्रम्प आणि मोदींमध्ये एकही फोन कॉल झाला नाही
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, “जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. अमेरिका, सौदी अरेबियासह अनेक देशांशी आमची चर्चा झाली, सर्व कॉल रेकॉर्डवर आहेत. ते माझ्या सोशल मीडिया हँडलवर देखील आहे. आम्ही सर्वांना हेच सांगितले की, जर पाकिस्तानला संघर्ष थांबवायचा असेल, तर त्यांनी आमच्या डीजीएमओ चॅनेलद्वारे विनंती करावी. १२ एप्रिल ते २२ जून या काळात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.”
📢 आजच्या सर्वात मोठ्या बातम्या!
राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि आणखी बरेच काही एका क्लिकवर. 📰 क्लिक करा