Shubman Gill News 2025: शुभमन गिलची इतिहासाला गवसणी! केला अशक्य वाटणारा पराक्रम, नेमकं काय घडलं?

Shubman Gill News : शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

Shubman Gill News

शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत एक अभूतपूर्व कामगिरी केली. तो पहिलाच असा कर्णधार ठरला, ज्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तब्बल चार शतके ठोकली.

Shubman Gill News : डेब्यू टेस्ट सिरीजमध्ये तीन-तीन शतकांची कामगिरी फक्त काही महान खेळाडूंनी केली होती?

आतापर्यंत डेब्यू टेस्ट सिरीजमध्ये तीन-तीन शतकांची कामगिरी फक्त काही महान खेळाडूंनी केली होती. सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव स्मिथ. पण गिलने त्यांनाही मागे टाकत इतिहास रचला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीतही शतक झळकावले आहे. यासोबत शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाचे महान सर डॉन ब्रॅडमन तसेच भारताचे सुनील गावसकर यांच्याशी बरोबरी केली आहे.आतापर्यंत कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम या दोघांच्याही नावावर होता. पण, दोघांनीही घरच्या मैदानावर हा पराक्रम केला तर शुभमन गिलने परदेशात पदार्पणाच्या कसोटी हा पराक्रम केला.

Top Marathi News

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत