Amit Shah on Operation Sindoor : अमित शाह यांची माहिती; “पाकिस्तानमध्ये 100 किमीपर्यंत घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, 11 हवाई तळ…”

Amit Shah on operation sindoor : ऑपरेशन सिंदूर राबवून आपण पाकिस्तानचा बदला घेतला. मोदींनी अचूक कारवाई करण्याची मुभा सैन्यदलांना दिली होती.

Amit Shah on operation sindoor

Amit Shah on operation sindoor : ऑपरेशन सिंदूर राबवून आपण पाकिस्तानचा बदला घेतला.

Amit Shah पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, यामध्ये २६ पर्यटक मारले गेले. मी त्या दिवशी लगेच श्रीनगरला जाण्यासाठी निघालो. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे याबाबतच्या सूचना दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं? असा प्रश्न विचारतात. मी आज त्यांना हे सांगतो की मोदींनी काय करुन दाखवलं. असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती लोकसभेत दिली.

मोदींनी काय केलं?

काँग्रेसची घोडचूक असलेला सिंधु जल करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या बैठकीत स्थगित करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला.

पाकिस्तान नागरिकांचा सार्क व्हिसा निलंबित करुन त्या नागरिकांना पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ते मोदींनी करुन दाखवलं.

सीसीएसने हा संकल्प केला की दहशतवाद्यांना आणि त्यांची ट्रेनिंग करणाऱ्या अड्ड्यांना आपण कठोर शब्दांत उत्तर देऊ. पहलगामची घटना घडली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते.

त्यांनी तो दौरा रद्द केला आणि ते तातडीने भारतात आले. त्यांनी तातडीने सुरक्षेसंबंधीची बैठक घेतली.

२४ एप्रिलला मोदींनी निवडणूक प्रचाराचं भाषण केलं नाही ते भाषण लोकभावना मांडणार होतं-अमित शाह

२४ एप्रिलला मोदींनी निवडणूक प्रचाराचं भाषण केलं हा जो आरोप विरोधकांनी केला, मात्र तो मला मुळीच मान्य नाही. जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होतो तेव्हा देशभरातल्या नागरिकांच्या भावना तीव्र असतात.

त्यासाठी त्यांना देशाच्या प्रमुखांनी उत्तर देणं महत्त्वाचं असतं म्हणून ते भाषण मोदींनी केलं होतं ते कुठलंही प्रचाराचं भाषण नव्हतं.

असं म्हणत अमित शाह यांनी मोदींच्या भाषणातले प्रमुख मुद्दे वाचले त्यावर ते म्हणाले की हे भाषण जर कुणाला निवडणूक प्रचाराचं वाटत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावी लागेल.

त्यांनी लोकांच्या मनातली भावना बोलून दाखवली होती. विरोधकांना जर यात निवडणूक प्रचाराचं भाषण वाटलं असेल तर यांचे चष्मे तसे आहेत. असाही टोला अमित शाह यांनी लगावला.

ऑपरेशन सिंदूर ७ मे च्या रात्री २२ मिनिटं चाललं-अमित शाह

ऑपरेशन सिंदूर हे ७ मे रोजी रात्री १ वाजून चार मिनिटांपासून रात्री १ वाजून २४ मिनिटांपर्यंत चाललं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

आपल्या देशाने पाकिस्तानला अचूक पण तेवढंच ठाम उत्तर दिलं. पाकिस्तानच्या एकाही निष्पाप नागरिकाला आपल्या देशातील सैन्याने हातही लावला नाही. पाकिस्तानला १०० किमी आत घुसून पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करुन आपण पाकिस्तानला उत्तर दिलं.

हाफिज मोहम्मद जमील, मुद्दसर खादियान, याकुब मलिक, महम्मद हमसाद जमील, मोहम्मद युसुफ, मोहम्मद हसन हे दहशतवादी मारले गेले. पहलगामचे दोषी कुठे गेले? असा प्रश्न विरोधक विचारतात.

मी जी नावं वाचली त्यातले आठ दहशतवादी असे होते ज्यांनी चिदंबरम गृहमंत्री असताना हल्ले केले आणि लपले होते त्यांना आपण निवडून मारलं.

पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केला याचाही विरोधकांना अभिमान नाही का? असाही खोचक प्रश्न अमित शाह यांनी केला.

हे मोदी सरकार आहे, मनमोहन सरकार नाही-अमित शाह

पाकिस्तानातून दहशतवादी येतील आणि हल्ला करुन निघून जातील आपण गप्प बसून राहू असं होणार नाही कारण हे मनमोहन सिंग यांचं सरकार नाही तर नरेंद्र मोदींचं सरकार आहे.

उरी, पुलवामा या हल्ल्यांचा बदला घेतला आणि पहलगामचाही बदला आपण घेतला असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. ९ मेच्या दिवशी आपण पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर निर्णय घेऊनच हे सगळं केलं. सैन्यदलांना पूर्ण मुभा देण्यात आली होती अशीही माहिती अमित शाह यांनी लोकसभेत दिली.

ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत